Breaking

Thursday, June 19, 2025

पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ असा असेल, गौतम गंभीर यांनी थेट नावंच सांगितली, पाहा Playing xi https://ift.tt/BC4ckH6

संजय घारपुरे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना फक्त काही तासांवर आलेला आहे. भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या बैठकीतून अंतिम संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळू शकते, हे आता स्पष्ट झाले आहे.

सलामीवीर..

पहिल्या सामन्यासाठी भारताचे सलामीवीर कोण असतील, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आता गंभीर यांनी दिले आहे. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे डावाची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे शुभमन गिल आता सलामीला येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

तिसऱ्या स्थानावर नेमकं कोण खेळणार..

विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर यायचा, पण त्याने आता निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता त्याच्या स्थानावर कोणाला संधी द्यायची, हेदेखील आता समोर येत आहे. आयपीएलमध्ये सलामीला येऊन सातत्याने धावा केलेल्या साई सुदर्शनला तिसरा क्रमांक देण्यात येणार आहे. त्याने या स्पर्धेत अभिमन्यू ईश्वरन आणि ध्रुव जुरेलला मागे टाकल्याची चर्चा आहे. मात्र त्याचवेळी नव्या चेंडूवर खेळण्याचा चांगला अनुभव असलेल्या करुण नायरचाही विचार होत आहे.

शुभमन गिल कितव्या स्थानावर खेळणार...

तिसऱ्या क्रमांकाचा निर्णय अद्याप झालेला नाही, मात्र चौथा आणि पाचवा क्रमांक निश्चित आहे. शुभमन चौथ्या क्रमांकावर खेळण्यास येईल असे निश्चित झाले आहे. संघात ऋषभ पंतचा पाचवा क्रमांक निश्चित आहे. सहाव्या क्रमांकावर यावेळी करुण नायरला संधी देण्यात येऊ शकते, असे आता म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी सलामीला अपयशी ठरल्यावर गिल तिसऱ्या क्रमांकावर आला होता. मात्र आता सचिन तेंडुलकर, विराट कोहली खेळलेल्या क्रमांकावर खेळणार आहे, असे पंतने सामन्यापूर्वी सांगितले.

दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश..

भारताच्या संघात यावेळी दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. यामधील पहिले नाव असेल ते रवींद्र जडेजा. कारण कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरऐवजी जडेजाचा अनुभव लक्षात घेऊन प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोक्याच्या वेळी डाव सावरल्यामुळे जाडेजाने बाजी मारली आहे. अष्टपैलूच्या दुसऱ्या जागेसाठी शार्दूल ठाकूर आणि नितीशकुमार रेड्डीमध्ये स्पर्धा आहे. त्यात नितीश वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

बुमराह खेळणार की नाही....

जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत खेळणार की नाही, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. पण बुमराहने आपण पहिल्या कसोटीत खेळणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बुमराह पहिल्या कसोटीत असेल. यावेळी बुमराहला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या वेगवान गोलंदांजांचा समावेश संघात असेल, असे संकेत गंभीर यांनी संघाच्या बैठकीत दिल्याचे समजते.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी आता भारतीय संघात कोणाला संधी मिळणार, हे स्पष्ट झालं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HZJtqdD

No comments:

Post a Comment