Breaking

Wednesday, June 11, 2025

रोहित शर्माच्या जागी श्रेयस नाही तर कोण होणार वनडे कॅप्टन, BCCI कोणाला करणार कर्णधार, पाहा.. https://ift.tt/wYVEUFk

मुंबई : रोहित शर्माला वनडे क्रिकेटमधून निवृत्त करायचचं, असा चंग कोणीतरी बांधलाय असे वाटत आहे. कारण सध्या वनडे क्रिकेट खेळले जात नसताना रोहितच्या निवृत्तीची मात्र जोरदार चर्चा सुरु आहे. रोहितच्या जागी श्रेयस अय्यर भारताचा वनडेमध्ये कर्णधार होईल, असे वाटत होते. पण आता रोहितच्या जागी श्रेयस नाही तर कोणाच्या नावाची बीसीसीआयमध्ये आता चर्चा सुरु झाली आहे, हे समोर आले आहे.रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता रोहित शर्मा भारतासाठी फक्त वनडे क्रिकेटच खेळू शकतो. रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळून निवृत्ती घेईल, असे म्हटले जात होते. पण वनडे वर्ल्ड कप मात्र २००७ साली होणा आहे. तोपर्यंत रोहित शर्मा ४० वर्षांचा होईल. पण रोहितचा फिटनेस पाहता तो अजून दोन वर्षे खेळू शकेल की नाही, याबाबत काही जणांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे रोहित जर वर्ल्डकप खेळणार नसेल तर त्याने आत्ताच निवृत्ती घ्यावी, असा दबाव त्याच्यावर टाकला जात आहे. बीसीसीआयने तर रोहितच्या जागी कोणाला कर्णधार करायचे, याचे नावही ठरवले आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्मा आपली वनडे क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर करेल, असे बीसीसीआयला वाटत होते. कारण टी २० वर्ल्ड कप जिंकल्यावर त्याने निवृत्ती जाहीर केली होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर मात्र रोहितने निवृत्ती जाहीर केली नाही, त्यामुळे आता त्याच्यावर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा दबाव आणला जात आहे. वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर सातत्यापूर्ण चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे रोहितनंतर श्रेयस अय्यर कर्णधार होईल, असे सर्वांना वाटत होते. पण आता श्रेयस नाही तर शुभमन गिलला वनडे संघाचे कर्णधारपद देणार असल्याचे बीसीसीआयने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे रोहितने कर्णधारपद सोडले की, आता शुभमन गिलला भारताचा पुढचा कर्णधाक बनवणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर गिलला कसोटी संघाचा कर्णधार केले होते. त्याचप्रमाणे रोहितने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली की, तिथेही रोहितचीच वर्णी लागवण्यात येणार असल्याचे आता बीसीसीआयने ठरवले आहे. रोहित शर्मावर आता वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा दबाव आणला जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता हे सर्व प्रकरण नेमकं कसं हाताळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6oyrDvI

No comments:

Post a Comment