Breaking

Wednesday, June 11, 2025

परभणी जिल्ह्यासाठी ४ दिवस 'यलो अ‍ॅलर्ट'; खबरदारी घेण्याची प्रशासनाची सूचना, विजांपासून वाचण्यासाठी संदेश https://ift.tt/MbnizP2

परभणी : भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरीता ११ ते १४ जून २०२५ या कालावधीत यलो अलर्टचा इशारा दिला आहे. या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणच्या सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.हे करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवावे. हे करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक पंढरपूर-शेगाव महामार्गावर पाणी नागरिकांचा आंदोलनाचा इशाराबीड: धारूर तालुक्यातील तेलगाव येथून पंढरपूर शेगाव महामार्गावर पाण्याचा निचरा करून न दिल्याने पाणी साठत आहे. या साठलेल्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत तेलगाव येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. त्यानंतर एमआरडीसी कंपनीचे अधिकारी आणि अभियंत्यानी तेलगाव येथे येऊन पाहणी केली. पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करुन महामार्ग मोकळा करुन देण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला तर ठीक नाहीतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा या वेळी नागरिकांनी दिला. धारूर तालुक्यातील मौजे तेलगाव येथून शेगाव-सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गास जागोजागी भेगा पडल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक लोकांचा बळी गेला आहे


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9idA051

No comments:

Post a Comment