मुंबई : विनोद कांबळीला आज युवराज सिंगचे वडील आणि भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांचे शब्द चांगलेच आठवत असतील. कारण विनोद कांबळीला योगराज यांनी तु आयुष्यभर कोणत्या एका गोष्टीमुळे रडशील, असे सांगितले होते. विनोद तेव्हा गुर्तीमध्ये होता आणि त्याने योगराज सिंग यांना नकोसं उत्तर दिलं होतं. विनोद कांबळीला आपण नेमका कोणता सल्ला दिला होता, हे योगराज सिंग यांनी बुधवारी सांगितलं आहे.
योगराज सिंग यांनी विनोदला काय सांगितलं होतं...
योगराज सिंग म्हणाले की, " विनोद कांबळी हा चांगला खेळत होता. विनोदचे चांगले नाव झाले होते. त्यावेळी मी विनोदला एक गोष्ट सांगितली होती. पार्ट्या करणं, सिगारेटी ओढणं, ललनांच्या मागे फिरणं, हे तु सर्व बंद कर. कारण एक खेळाडू म्हणून तुझ्यासाठी हे घातक आहे. कारण खेळाडूला फिटनेसही ठेवावा लागलो आणि मैदानात सकर्त राहावं लागतं. जर या गोष्टी तु सोडल्या नाहीस तर तुझं करीअर लवकर संपून जाईल आणि त्यानंतर आयुष्यभर तु रडत राहशील. "विनोद कांबळीने योगराज यांना काय उत्तर दिलं होतं...
योगराज सिंग यांनी त्यानंतर सांगितले की, " मी विनोदला चांगला सल्ला दिला होता, जेणेकरून त्याचे करीअर उत्तम होईल. पण त्यावेळी विनोद त्याच्याच विश्वात असायचा आणि त्यावेळी गुर्मीत त्याने मला उलट उत्तरंही दिलं होतं. विनोद मला म्हणाला होता की, ' सर, तुमचे दिवस आता संपले आहेत, आता माझे दिवस आहेत. ' विनोद कांबळीला त्यावेळी वाटायचं की, आपणच राजे आहोत. पण कोणताही खेळाडू कधीही खेळापेक्षा मोठा नसतो, तर खेळ त्याला मोठं करत असते, हे विनोद विसरला. आता तुम्ही विनोदची अवस्था पाहिलीच असेल. जर विनोदने त्यावेळी माझं ऐकलं असतं तर त्याची अशी अवस्था नक्कीच अशी नसली असती आणि त्याचं करीअरही चांगलं झालं असतं. " विनोद कांबळीची काही दिवसांपूर्वी झालेली केविलवाणी अवस्था सर्वांनीच पाहिली होती. विनोद आता कुठे फिट होत आहे. पण विनोद कांबळीला युवराज सिंगचे वडील योगराज यांनी सत्य सांगितलं होतं. तुझी कशी आणि कोणामुळे अशी परिस्थिती होईल, हेदेखील योगराज यांनी विनोदला सांगितले होते. पण त्यावेळी विनोद गुर्मीत होता आणि त्याने योगराज यांना उलट उत्तर दिलं होतं. जर विनोदने त्यावेळी योगराज यांचं ऐकलं असतं तर आमची परिस्थिती निश्चितच वेगळी असली असती. त्यामुळे विनोदच्या या वाईट परिस्थितीला तोच कारणीभूत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hQcO5UI
No comments:
Post a Comment