Breaking

Tuesday, June 10, 2025

मुंबईत २२७ प्रभागांनुसार महापालिका निवडणूक, राज्यात 'मिनी विधानसभे'चे पडघम, सरकारकडून प्रभागरचनेचे आदेश https://ift.tt/HSwNGAU

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या राज्यातील बहुप्रतीक्षित वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश मंगळवारी नगरविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आले. त्यानुसार राहणार आहेत. या आदेशानुसार राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर यांच्यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग असतील., देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीचा बार उडेल, हे आता स्पष्ट झाले आहे. अ, ब आणि क महापालिका क्षेत्रातील प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्तांवर तर ड महानगर पालिकेतील प्रभाग रचनेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. इतर मागास वर्गाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार स्थानिक निवडणुकांसाठी राज्य सरकार कामाला लागले आहे. या प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे.प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करेपर्यंत ही प्रभाग रचना गुप्त ठेवण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहे. या प्रक्रियेस कोणतीही निश्चित कालमर्यादा देण्यात आली नसली तरी अडीच ते तीन महिन्यात ही प्रभाग रचना पूर्ण होणे अपेक्षित आहे.मुंबई महापालिकेसाठी ८ सप्टेंबर २०२२च्या अधिनियमानुसार २२७ प्रभागांनुसार प्रभाग रचना प्रारूप करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रभाग रचना करताना महापालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणकतज्ञ यांची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आधिकार देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करायची आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर महापालिका आयुक्तांकडून प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती आणि सूचना मागवून, त्या प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.नगर विकास विभागाने नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेचे आदेशही निर्गमित केले आहेत. २५ जानेवारी २०२२च्या अधिनियमानुसार ही प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

येथे चार सदस्यीय प्रभाग -

अ वर्ग : पुणे, नागपूर ब वर्ग : ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड क वर्ग : नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर ड वर्ग : मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, पनवेल यांसह १९ महापालिका

महानगरपालिका

एकूण महाालिका- २९ (जालना आणि इचलकरंजी नवनिर्मित)प्रशासक असलेल्या महानगरपालिका- २९

नगरपरिषदा

एकूण नगरपरिषदा- २४८प्रशासक असलेल्या आणि नवनिर्मित नगरपरिषदा- २४८

नगरपंचायती

एकूण नगरपंचायती- १४७प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित नगरपंचायती- ४२प्रशासक असलेल्या एकूण नगरपरिषदा आणि नगरपंचायती (२४८+४२)- २९०


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YD2qwu4

No comments:

Post a Comment