Breaking

Thursday, June 12, 2025

विक्रांत मेस्सीवर कोसळला दु:खाचा डोंगर, अहमदाबाद दुर्घटनेत वैमानिक भावाचा मृत्यू; अभिनेत्याची मन हेलावणारी पोस्ट https://ift.tt/jhC9D0x

मुंबई: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरले आहे. अहमदाबादहून लंडनकरिता 12 जून रोजी दुपारी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळले. हे फ्लाइट AI-171 मेघानीनगर परिसरात कोसळले आणि दुर्घटना इतकी भयानक होती की विमानात उपस्थित 200 हून अधिक प्रवाशांच्या मृत्यू झाल्याचा दावा केला जातो आहे. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. आतापर्यंत केवळ रमेश विश्वकुमार ही एकच व्यक्ती बचावल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबदमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. यादरम्यान आता एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे की, या विमानाचे सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर हे अभिनेता विक्रांत मेस्सीचे नातेवाईक होते. स्वत: सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली. या भावना व्यक्त करताना विक्रांतने अशी माहिती दिली की, त्याचे काका क्लिफर्ड कुंदर यांनी या अपघातात त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदर यांना गमावले. क्लाइव्ह या विमानाचे सह-वैमानिक होते आणि त्यांचाही जागीच मृत्यू झाला. विक्रांतने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ही हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले की, 'अहमदाबादमध्ये आज घडलेल्या अकल्पनीय दुर्दैवी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि प्रियजनांसाठी माझे मन खूप दु:खी झाले आहे. माझे काका क्लिफर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदर गमावला, हे सर्वाधिक वेदनादायी आहे, तो त्या दुर्दैवी विमानात काम करणारा फर्स्ट ऑफिसर होता. काका देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि जे या घटनेमुळे प्रभावित झाले आहेत त्या सर्वांना शक्ती देवो.' या दुर्दैवी घटनेतील विमानात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 242 लोक होते. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या नेतृत्वाखाली या विमानाचे उड्डाण करण्यात आलेले, जे 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेले अनुभवी वैमानिक होते. तर कॉकपिटमध्ये त्यांना मदत करणारे फर्स्ट ऑफिसर हे क्लाइव्ह कुंदर यांना 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EW6n3qF

No comments:

Post a Comment