वॉशिंग्टन : अमेरिकेतील नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन झाले. या घटनेमुळे भारतात नाराजी पसरली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याला बेड्या ठोकल्या. त्याला जमिनीवर पाडले आणि मानेवर गुडघा ठेवला. नंतर त्याला भारतात परत पाठवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेवर भारतीयांनी राग व्यक्त केला आहे. यानंतर दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "अवैधपणे प्रवास करणाऱ्या लोकांना स्वीकारणार नाही." दूतावासाने सांगितले की, तो अमेरिकेत गैरमार्गाने गेला होता, त्यामुळे त्याला परत पाठवण्यात आले.अमेरिकेच्या दूतावासाने 'X' (ट्विटर) वर माहिती दिली आहे. ते म्हणाले, "जे लोक कायदेशीर मार्गाने येतात, त्यांचे आम्ही स्वागत करतो. पण अमेरिकेत अवैधपणे प्रवेश करणे, व्हिसाचा गैरवापर करणे किंवा अमेरिकन कायद्याचे उल्लंघन करणे आम्ही सहन करणार नाही." दूतावासाने स्पष्ट केले की, अमेरिकेत प्रवास करणे हा कोणाचाही हक्क नाही. भारतीय वाणिज्य दूतावासाने घटनेची घेतली दखल न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, ते स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. दूतावासाने 'X' वर लिहिले आहे, "नेवार्क लिबर्टी इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका भारतीय नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागला, अशी पोस्ट आम्ही पाहिली आहे. आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत. भारतीय नागरिकांच्या हितासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत." कुणाल जैन नावाच्या एका भारतीय-अमेरिकन उद्योजकाने 8 जून रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. जैन यांनी 'X' वर लिहिले, "मी काल रात्री न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावर एका तरुण भारतीय विद्यार्थ्याला हतकड्या ठोकून, एखाद्या वागवत असताना पाहिले. तो विद्यार्थी रडत होता आणि स्वतःची बाजू मांडत होता, पण त्याचे कोणी ऐकले नाही." जैन यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर या घटनेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोक या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RvLY7C3
No comments:
Post a Comment