भोपाळ : मध्यप्रदेश जिल्ह्यातील एका भाजप नेत्याच्या काळ्या करतुती समोर आल्या आहेत. हॉटेलच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली राणी दुर्गावती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्ते अतुल चौरसिया यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आसाममधील एका मुलीने त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर गढा पोलिसांनी ठाण्याने ही कारवाई केली आहे.मुलीने पोलिसांना सांगितले की, ती तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात जबलपूरला आली होती. या काळात तिची भेट अतुल आणि शीतलशी झाली. दोघांनी तिला हॉटेलमध्ये राहायला लावले. त्यानंतर, मोठ्या कमाईचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायातही ढकलले. पोलिसांनी अतुल चौरसियाला अटक केली आहे. शीतल दुबे नावाचा आणखी एक आरोपी सध्या फरार आहे.पीडितेने सांगितले की, हॉटेलमध्ये येणाऱ्या पुरुषांना थेट तिच्या खोलीत पाठवले जात असे. प्रत्येक ग्राहकाकडून २ ते ५ हजार रुपये घेतले जात होते. पण मला मात्र खूप कमी पैसे दिले जात होते. जेव्हा जेव्हा मी पैसे मागायची तेव्हा गप्प बसायला लावले जायचे. पैसे मागितल्यावर मला अनेकवेळा धमकावण्यातही आले.मुलीने असेही सांगितले की, ती चार महिन्यांपूर्वी कशीतरी त्यांच्या तावडीतून सुटली होती. ती भाड्याच्या घरात राहू लागली. अलीकडेच, जेव्हा तिने तिच्या थकलेल्या पैशांची मागणी केली तेव्हा अतुल आणि शीतलने धमकावण्यास सुरुवात केली. घाबरून ती मुलगी थेट गढा पोलिस ठाण्यात गेली आणि पोलिसांना तिने सर्व प्रकार सांगितला. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि अतुल चौरसियाला अटक केली. शीतल दुबे अद्यापही फरार आहे. पोलीस दोघांच्याही गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी करत आहेत. हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गढा पोलिस स्थानक जबलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याची तयारी करत आहे.पोलीस हॉटेलच्या अभ्यांगतांच्या रजिस्टर नोंदी आणि सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पोलिसांना संशय आहे की, हे स्थानिक नेटवर्क नाही. उलट, हे एक संघटित सेक्स रॅकेट आहे, जे बऱ्याच काळापासून चालू होते. आरोपींच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स देखील तपासले जात आहेत. जेणेकरून या व्यवसायात सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळख पटवून अटक करता येईल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xIhz93G
No comments:
Post a Comment