मुंबई- बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्रींची ये जा चालू असते. काही जणी या मर्यादित सिनेमांमध्ये दिसतात मात्र त्यांच्या सौंदर्य व अभिनयाने प्रेक्षकांवर त्यांची वेगळी छाप पडलेली असते. अशीच एक अभिनेत्री लगान सिनेमात पाहायला मिळालेली. त्या अभिनेत्रीचे नाव होते. लगानमधला तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडेला की तिच्या फॅन्सच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली पण कालांतराने ही अभिनेत्री एकाकी गायब झाली. आता या अभिनेत्रीबाबत एक नवीन व आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. ग्रेसी सिंहने आतापर्यंत , अजय देवगण, संजय दत्त, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. लान, मुन्ना भाई एमबीबीएस , गंगाजल यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे नाव तिच्या कारकिर्दीत जोडले गेले. आमिर आणि ग्रेसी यांचा 2001 मध्ये आलेल्या लगान सिनेमाने इतिहास रचला. या सिनेमाला ऑस्कर नामांकनसुद्धा मिळालेले. एवढे असूनही ही अभिनेत्री अचानक हळूहळू गायब झाली. ती एवढं सुपरहिट करियर असूनही ती गायब का झाली ते जाणून घेऊ. तिच्या जीवनाच्या मार्गावर अचानक मोठा युटर्न घेतला आहे. तिने ग्लॅमरस जग सोडून आता भक्तीचा मार्ग स्विकारला आहे, त्यासाठी तिने आता संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे. आता ती ब्रम्हकुमारीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेताना दिसते. ती सध्या ध्यान, योग, सेवा या माध्यमातून आत्मिक विकास करतेय. ब्रम्हकुमारीमध्ये सहभागी झाल्यावर ग्रेसीने एका जुन्या मलाखतीत सांगितले होते, मी असीम सुरक्षा, शांती, आनंद, स्विकृती आणि सहयोगाचा अनुभव घेतला. ग्रेसी एक प्रशिक्षित भरतनाट्यम आणि ओडिसी डान्सर आहे. ती ब्रम्हकुमारी प्रोग्राममध्ये आपल्या नृत्याच्या माध्यमातून आध्यात्मिक संदेश लोकांपर्यत पोहचवत असते. ग्रेसी आता 44 वर्षांची असून तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेसी शेवटची संतोषी मां या मालिकेत दिसली होती. ग्रेसीचा जन्म 20 जुलै 1980 दिल्लीत झालेला. त्यानंतर तिने 1997 मध्ये अमानत या टीव्ही मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर 2001 मध्ये आलेल्या लगानमधून ती रातोरात स्टार बनली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4Te37Ew
No comments:
Post a Comment