रहीम शेख, धाराशिव : मुल, मुली एकमेकावर प्रेम करतात, आणाभाका घेतात. लग्नाचे स्वप्न पाहतात.सुखी संसाराची स्वप्न पाहतात. आणि एकमेकात समरुप होतात. मुली मुलावर विश्वास ठेवतात.आणि कुठल्या ही संकटाला सामोरे जाण्यास तयार होतात. असच संकट धाराशिव जिल्हयातील कळंब तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन आले.ज्याच्यावर प्रेम केल त्या जोडीदाराने त्यांच्या मित्रांच्या हवाली प्रियसीला केल. तिघांनी मिळुन त्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केलाय.तक्रारदार मुलीची ओळख झाली ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवत मुलांने मुलीवर वारंवार अत्याचार केले.१६ जुन रोजी मुलीचे वडिल शेताकडे गेले होते. घरी आई,बहिण,भाऊ होते. रात्री १२ वाजता दरवाजा वाजला मुलीला वाटले वडिल आले म्हणुन दरवाजा उघडला तर समोर तो मुलगा होता. तु माझ्या बरोबर चल आपल्याला आपल्या लग्ना बद्दल बोलायचे आहे.असे म्हणुन मुलीला घेवुन गेला.सोबत मित्र होताच. जवळे दुमाला रोडवरील पत्र्यांच्या शेडवर मुलीला घेवुन गेले. तेथे तिसरा मित्र अगोदरच आला होता. पत्र्याच्या शेड मध्ये गेल्यानंतर मुलीने मुलास म्हटले लग्ना बद्दल लवकर बोल मला लवकर घरी जायचय घरचे उठतील, मला नेऊन सोड असे म्हणताच मुलाने बळजबरीने शाररिक संबध ठेवले.नंतर माझ्या मित्रांना देखील शाररिक संबध ठेवु दे असे म्हणताच मुलीने विरोध केला."मी बापाचे ऐकत नाही, पण मित्रांचे ऐकतो,माझ्या मित्रांना शाररिक संबध ठेवु दे नाही तर तुझ्या वडिलांना,चुलत्यांना जिवंत मारुन टाकिन अशी धमकी देत तिघांनी या मुलीवर सामुहिक अत्याचार केला. गावात कोणाला सांगितलेस तर घरच्यांना जिवंत मारुन टाकिन अशी दिली नंतर घरी आणुन सोडले. पिडित मुलीने घडलेला सर्व प्रसंग वडिलांना सांगितला.ढोकी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ६४,६४(२ (m),६४(२ (i),६५(१),७०(१),३५१(२)३५१(३),३(s)bns,४,५(ग)५(L)६,८ नुसार २३ जुन रोजी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असुन ढोकी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सहाय्यक निरिक्षक विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्सपेक्टर आरती जाधव या तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/irmz5Dp
No comments:
Post a Comment