Breaking

Tuesday, June 17, 2025

'ती रात्र फार वाईट गेली अन्...' शरद पोंक्षेंनी सांगितला तो कठीण काळ, काय घडलेलं नेमकं? https://ift.tt/nKQaNS4

मुंबई - हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. शरद पोंक्षे कायम सोशल मीडियाच्या मार्फत सामाजिक, राजकीय घडामोडींवर त्यांचं मत व्यक्त करत असतात आणि त्यामुळे ते चर्चेत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलसुद्धा केलं जातं, पण ते ट्रोलिंगला बळी पडत नाहीत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा शरद पोंक्षे यांच्या आयुष्यात खळबळ उडाली, पण तरीही ते डगमगले नाहीत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत शरद पोंक्षे यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, शरद पोंक्षे यांनी त्यांनी कॅन्सरवर कशी मात केली, याबद्दल भाष्य केलं आहे. शरद पोंक्षेंनी २०१९मध्ये कॅन्सरवर मात करत, 'हिमालयाची सावली' या नाटकातून दमदार एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, शरद पोंक्षे यांना त्यांच्या कॅन्सरच्या जर्नीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, 'मी मानसिक दृष्ट्या खचलोच नाही, एक रात्र माझी फार वाईट गेली. ज्या दिवशी मला सांगितलं ना, तुम्हाला कॅन्सर झालाय, ती रात्र फार वाईट गेली. घरी एकटाच होतो, घरी कुणालाच सांगितलं नाही मी. दुसऱ्यादिवशी सकाळी सांगितलं. सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं, छोटीशी आयुष्यात एक गडबड झालीये. एक वर्षनाही करता येणार, मला लगेच उद्या ऍडमिट व्हायचंय. एकदम सगळे रडायला लागले, मग मीच सगळ्यांना जवळ घेतलं, समजावून सांगितलं. कॅन्सर नाही मला संपवू शकत.' 'साधारण मला असं वाटतं, औषधं तुम्हाला नाही बरं करत, तुम्ही तुम्हाला बरं करता. अत्यु्च्च जगण्याची इच्छा आणि अशावेळेला निर्व्यसनी असणं कामी येतं. मग लोक म्हणाले की शरद तर सुपारीही खात नाही, त्याला कसा काय झाला. त्यामुळे कॅन्सर होतो की नाही ते नाही माहित पण, कॅन्सरमधून बरं होण्यासाठी निर्व्यसनी असणं शंभर टक्के उपयोगी पडतं. याचं कारण म्हणजे, दारू पिऊन किडन्या गेलेल्या नसतात, सगळे अवयव शाबूत असतात. आणि मग असं वादळ आलं की, त्याला पळवून लावायला तुमचं शरीर ताकदीनं उभं राहतं.' असं शरद पोंक्षेंनी पुढे सांगितलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dzEkxf9

No comments:

Post a Comment