पुणे:- पुणे ग्रामीण यांनी मुलांत, तर परभणी यांनी मुलांत " १ल्या आदित्य चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेते" विजेतेपद पटकावले. शिवशक्ती महिला संघाने या सामन्याचे आयोजन केले होते. पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील मॅट वर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीणने पिंपरी चिंचवड संघाचा प्रतिकार चुरशीच्या लढतीत ३३-३२ असा संपवत जेतेपद पटकाविले. आक्रमक सुरुवात करीत पिंपरी चिंचवडने पहिला लोण देत १२-०३ अशी भक्कम आघाडी घेतली. पूर्वार्धात १७-०७ अशी आघाडी होती. पण उत्तरार्धात डाव पलटी झाला. पुणे ग्रामीण संघाने उत्तरार्धात जोरदार कम बॅक करीत शेवटच्या काही मिनितात २४-२४ अशी बरोबरी साधली. शेवटी लोण देत २८-२६ अशी आघाडी घेत १गुणाने बाजी मारली. वर्षा बनसडे, सई शिंदे यांच्या कल्पक चढाया त्यांना सानिका वाकसे ची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. संतोषी थोरवे, कार्तिक घेरवे यांच्या चढाया उत्तरार्धात कमी पडल्या. सानिका पांडुरे हिचा बचाव ही कमी पडला. म्हणून पिंपरी चिंचवडला निसटत्या पराभवाला सामोरी जावे लागले.मुलांच्या अंतीम सामन्यात परभणीने औरंगाबाद वर ४१- २१ असा सहज पराभव करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात परभणी कडे १८- १२ अशी आघाडी होती. पूर्वार्धात एक व उत्तरार्धात २ लोण देत परभणीने हा विजय सोपा केला. सारंग रोकडे, किशोर जगताप यांच्या आक्रमक चढाया त्यांना सोमेश्वर खोपे, जीवन जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. औरंगाबादच्या नागेश पवार, विराज राठोड, शुभम गवळी यांच्या प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला.सई शिंदे, सुहानी माने, सानिका वळसे पुणे ग्रामीण कडून, तर मोनिका पवार, कल्याणी शिंदे जालना कडून उत्तम खेळले. मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने पिंपरी चिंचवडला ४८-३७ असे, तर औरंगाबादने जळगांवला ४०-३७ असे नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार व दैनंदिन सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या हस्ते झाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MzOSB1e
No comments:
Post a Comment