लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी आता फक्त काहीच तास उरले आहेत. पण आता भारताचा कर्णधार शुभमन गिलची चिंता वाढली आहे. कारण भारताच्या संघात आता स्टार खेळाडूची एंट्री झाली आहे. पण आता संघात कोणाला संधी द्यायची, याचा विचार करताना गिलची चिंता चांगलीच वाढलेली आहे.
जसप्रीत बुमराहसाठी शोधला पर्याय...
शुभमन गिलने जसप्रीत बुमराह सर्व सामन्यांत खेळेल, असे मोठं वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर बुमराहने आपण तीन सामने खेळणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शुभमन गिलने जसप्रीत बुमराहसाठी पर्याय शोधला होता. पण यानंतर आता गिलचीच चिंता वाढेलली आहे.बुमराहच्या जागेसाठी कोणाची केली निवड, पाहा...
जसप्रीत बुमराह जर पहिल्या सामन्यात खेळला नाही तर त्याच्या जागी स्टार वेगवान गोलंदाज संघात असावा, असे गिलला वाटले. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या जागी आता गिलने भारतीय संघात हर्षित राणाला संधी दिली आहे. हर्षित राणा हा बुमराहचा पर्याय म्हणून भारतीय संघात दाखल झाला आहे.पहिल्या कसोटीपूर्वी गिलची चिंता कशी वाढली...
हर्षित राणाला बुमराहचा पर्याय म्हणून संघात आणले आहे. गिलला राणाला संघात स्थान द्यायचे होते. पण बुमराहने आता पहिल्या कसोटीसाठी आपण फिट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता काहीही झाले तरी गिलला बुमराहला खेळवावं लागणार आहे. पण दुसरीकडे राणाचे मन मात्र दुखावले जाणार आहे. दुसरीकडे बुमराहच्या जागी राणाला संधी दिली, तर गिलवर घणाघाती टीका होऊ शकते. बुमराह फिट असल्याचे म्हणत आहे, पण जर त्याला सामन्यात दुखापत झाली तर काय करायचं, कारण आता फक्त डोक्याला दुखापत झाल्यावरच बदली खेळाडू मिळू शकतो. त्यामुळे आता गिलची चिंता वाढलेली आहे. गिलची ही पहिलीच कसोटी मालिका आहे, पण त्यापूर्वीच त्याच्यावरचे दडपण कमालीचे वाढलेले असेल. शुभमन गिलची कर्णधाक म्हणून पहिली कसोटी २० जूनपासून सुरु होणार आहे. पण त्यापूर्वीच आता गिलवरील दडपण कमालीचे वाढलेले आहे. कारण आता या संघाची निवड करताना त्यांना कमालीची सतर्कता ठेवावी लागणार आहे. पण या सामन्यात बुमराहला संधी मिळणार की राणाला, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oPG7nwy
No comments:
Post a Comment