Breaking

Saturday, July 5, 2025

बाजारातून खरेदी करुन परतत असताना वृद्ध व्यक्तीला हिरकणी बसची धडक अन्...; रायगडमधील घटना https://ift.tt/9sUpPmJ

अमुलकुमार जैन ,रायगड : काही महिन्यापूर्वी अलिबाग स्थानकाबाहेर तसेच मुरुड शहराच्या बाहेर बसच्या धडकेने मोटर सायकलस्वार याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती तशीच घटना जिल्ह्यातील बस स्थानकात घडली असून यामध्ये मनोहर नाखरेकर (वय ६५वर्षे, धनगर आळी, रोहा, रायगड.) यांचा दुर्देवी मृत्यू झाली असल्याची घटना शुक्रवारी ८.१५ च्या सुमारास घडली आहे. मात्र अपघातानंतर बस चालक हा बस सोडून पसार झाला होता.याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिका हद्दीतील मौजे धनगर आळी येथील रहिवाशी असणारे पासष्ट वर्षीय मनोहर नाखरेकर बाजारातून खरेदी करून परतत असताना रोहा बस स्थानक येथे सातारा-वाई-महाबळेश्वर-महाड मार्गे रोहा बस क्रमांक एमएच १४ केक्यू ३९७० ही "हिरकणी" बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवली जात होती.सातारा-वाई-महाबळेश्वर-महाड मार्गे रोहा येणाऱ्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसचा पुढील चाक त्यांच्या पोटावरून गेल्यामुळे मनोहर नाखरेकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नाखरेकर यांना रुग्णवाहिकामधून तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे नेण्यात आले, त्यावेळी उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी मनोहर नाखरेकर यांना घोषित केले.या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून बस स्थानकातील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात कॉ. गु.र.नं. १३६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी रविंद्र दौडकर आणि पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.या अपघातात मृत्यू पावलेले इसम मनोहर धोंडू नाकरेकर हे नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सारिका पायगुडे यांचे वडील असल्याची माहिती मिळाली आहे. माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी घटनेची माहिती तात्काळ स्थानिक आमदार व खासदार सुनील तटकरे यांना फोनवरून दिली व फोनवरून अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घडलेल्या घटनेचे लेखी पत्र मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुलाला देण्यात आले व त्यानंतर . मृतदेह शवविच्छेदन करीता शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Fae8UuL

No comments:

Post a Comment