बर्मिंगहम : भारताने दुसऱ्या कसोटीतवर मोठा विजय साकरला. इंग्लंडसाठी ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट ठरली. कारण त्यांना मोठ्या फरकाने या सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा संघ या सामन्यात विजय मिळवू शकला असता, पण इंग्लंडच्या पराभवाचा नेमका व्हिलन कोण ठरला, हे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सामन्यानंतर सांगितलं.या सामन्यात अशा काही वेळा आल्या होत्या, त्यावेळी इंग्लंडला सामन्यात वरचढ होण्याची संधी होती. त्यावेळी जर इंग्लंडने चांगली कामगिरी केली असती तर त्यांना सामना जिंकता आता असता. पण इंग्लंडसाठी यावेळी एक खेळाडू व्हिलन ठरला. त्यामुळे इंग्लंडला या सामन्यात बॅकफूटवरच राहावे लागले. भारताचा कोणता खेळाडू इंग्लंडसाठी सर्वात घातक ठरला, हे स्टोक्सने सामना संपल्यावर सांगितलं.सामना संपल्यावर बेन स्टोक्स म्हणाला की, " या सामन्यात दोन वेळा आम्हाला चांगल्या संधी चालून आल्या होत्या. पहिल्या डावात आम्ही भारताचे पाच विकेट्स २०० धावांवर बाद केले होते, त्यावेळी आम्हाला त्यांना लवकर ऑल आऊट करता आले असते. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या डावात आम्हाला संधी मिळाली होती. त्यावेळी भारताचे पाच विकेट्स ८० धावांवर पडले होते. पण या संधाीचेही आम्हाला सोनं करता आलं नाही. या दोन्ही वेळा आमच्यासाठी एकच खेळाडू असा ठरला, ज्याने सामन्याटा नूर पालटला. तो खेळाडू म्हणजे शुभमन गिल. शुभमन गिलने दोन्ही डावांत दमदार फलंदाजी केली. आम्ही त्याला बाद करण्याचा बराच प्रयत्न केला. आम्ही आमची रणनितीही बदलून पाहिली, पण त्याचा शुभमन गिलवर कोणताही परीणाम झाला नाही. आमच्या हातात जे जे काही होतं, ते आम्ही केलं, पण आम्हाला त्यामध्ये यश मिळालं नाही. त्यामुळेच आम्हाला हा सामना गमवावा लागला. कारण जेव्हा शरीर आणि मन थकलेलं असतं तेव्हा तुमच्याकडून चांगली कामगिरी होत नाही. हे कारण पराभवासाठी योग्य ठरणार नाही. यानंतरही आम्हाला या परिस्थितीमधून जावं लागणार आहे. जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक्स यांनी चांगली फलंदाजी केली. पण आम्हाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही आणि तिथेच आमचा पराभव झाला. " भारताने या सामन्याच्या पाचही दिवसांवर आपलं वर्चस्व कायम राखलं आणि त्यामुळेच त्यांना हा सामना जिंकता आला. आता तिसऱ्या सामन्यात भारताचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WvpuhSo
No comments:
Post a Comment