Breaking

Friday, July 4, 2025

देर आए दुरुस्त आए.. भारताने फॉलोऑनची संधी गमावली पण आघाडी मिळवली, सिराजने इंग्लंडला धुळ चारली https://ift.tt/DWGdFfa

संजय घारपुरे : भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला फॉलोऑन देण्याची स्वप्न पाहत होता. पण हॅरी ब्रुक्स आणि जेमी स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर भारताचे हे स्वप्न धुळीस मिळाले. पण त्यानंतर मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. सिराजच्या सहा बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. त्यानंतर भारताने तिसऱ्या दिवस अखेर १ बाद ६४ अशी मजली मारली आहे. भारताकडे आता या सामन्यात एकूण २४४ धावांची आघाडी आहे.इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी जोरदार सुरुवात करताना दोन चेंडूंत दोन फलंदाज बाद केले, मात्र त्यानंतर भारताला विकेटसाठी दिर्घ प्रतिक्षा करावी लागली. हॅरी ब्रूक आणि पहिल्या कसोटीत भारतास सतावलेला जॅमी स्मिथने भारतीय गोलंदाजांनी घाम गाळल्यानंतरही त्यांना यशापासून वंचित ठेवले. दोघांनी आक्रमक शतके करताना त्रिशतकी भागीदारी केली, त्यामुळे भारताचे इंग्लंडला फॉलोऑन देण्याचे स्वप्न विरत गेले. पहिल्या सत्रात ब्रूक आणि स्मिथने १७२ धावा वसूल केल्या. दुसऱ्या सत्रात भारतीयांनी धावगतीस वेसण घातली, पण त्यांना एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंडचा निम्मा संघ भारतीयांनी ८४ धावांत २१.४ षटकांत टिपला होता. सहाव्या विकेटसाठी भारतास ८२.२ षटकांपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. या दरम्यानच्या ३६८ चेंडूंत इंग्लंडच्या जोडीने ३०३ धावा वसूल केल्या होत्या. ही जोडी जमलेली असताना मोहम्मद सिराजने लागोपाठच्या चेंडूवर जो रुट आणि बेन स्टोक्सला बाद केले होते, याची आठवण करुन द्यावी लागत होती. स्मिथ मैदानात आला आणि इंग्लंड फलंदाजीने जणूकात टाकली. त्याने आक्रमक फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व मिळवले. त्याने उपाहारापूर्वीच शतक करताना १७ चौकार मारले होते. त्याच्या धडाक्यामुळे ब्रूक काहीसा शांत वाटत होता. ब्रूकने १३७ चेंडूंत तीन आकडी मजल मारली होती. स्मिथनेच इंग्लंड संघावरील दडपण दूर केले होते. तो प्रत्येक भारतीय गोलंदाजाची योजना आक्रमक फटकेबाजीने हाणून पाडत होता. खेळपट्टीही गोलंदाजांशी फटकून वागत असल्यामुळे फलंदाजांचे काम सोपे झाले होते. नितिश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर स्मिथचा अवघड झेल घेण्यास ऋषभ पंत अपयशी ठरला हे सोडल्यास भारतीयांना विकेटची संधीच मिळाली नाही. भारतीयांनी मारा अधिक धारदार करण्यासाठी दोन फिरकी गोलंदाज खेळवले, पण जाडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदरचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यांनी फलंदाजांना क्वचितच चकवले. या दोघांना रिव्हर्स स्वीप करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कुचराई केली नाही. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर तर इंग्लंड सहज धावा करीत होते. त्याने लेग साईडला सहा क्षेत्ररक्षक लावून आखूड टप्प्याचा मारा सुरू केला, पण त्याच्या १२व्या षटकांत २३ धावा वसूल करण्यात आल्या. एकंदरीत पाहता इंग्लंडला पहिल्या डावाच्या आघाडीपासून रोखणेच भारतीय गोलंदाजांच्या हाती आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DkSFagw

No comments:

Post a Comment