बर्मिंगहम: शुभमन गिलने द्विशतक झळकावत एकाच सामन्यात बरेच रेकॉर्ड्स मोडीत काढले. पण हे द्विशतक एक मोठी चूक सुधारल्यामुळे झालं आहे, अशी कबुली शुभमन गिलनेच दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर दिली. या द्विशतकामागे खरं कारण आहे तरी काय, हे शुभमन गिलने स्वत:हून एका खास मुलाखतीमध्ये सांगितले.शुभमन गिल हा गुरुवारचा दिवस आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. कारण गिलने या सामन्यात एकामागून एक बरेच रेकॉर्ड्स मोडले. गिलने या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या रचली. कारण गिलची यापूर्वी १४७ ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. पण गिलने या सामन्यात द्विशतक झळकावत आपला सर्वोच्च स्कोअर नोंदवला. गिलने त्यानंतर मोह्ममद अझरुद्दीन, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर विराट कोहली यांचे रेकॉर्ड्स मोडीत काढले. पण हे सर्व होत असताना तो आपण केलेली चूक विसरला नाही.शुभमन गिल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर म्हणाला की, " या सामन्यात मी चांगल्या लयीत होतो. माझ्यासाठी संघाच्या धावा किती होतात, हे महत्वाचे होते, गेल्या सामन्यातही आम्हाला मोठी खेळी साकारण्याची संधी होती. पण ती संधी आम्ही गमावली. कारण त्यावेळी माझ्याकडून एक चूक घडली होती. गेल्या सामन्यातही मी शतक झळकावले होते. पण त्यानंतर दीड शतकाजवळ मी जेव्हा आलो तेव्हा मी चुकीचा फटका खेळण्यासाठी गेलो आणि बाद झालो. मी अजून काही काळ त्यावेळी जर खेळपट्टीवर राहीलो असतो तर नक्कीच भारतीच धावसंख्या अजून जास्त झाली असती. पण ही चूक माझ्या लक्षात आली. त्यामुळे ही चूक मी या सामन्यात सुधारली. कारण या सामन्यात मी शतक झळकावल्यावही मोठी फटकेबाजी करायला गेलो नाही. दडपणाखाली शांत राहिलो, पण संघाचा धावफलक मी हलता ठेवला. एकेरी-दुहेरी धाव घेत राहीलो. त्यामुळे हे द्विशतक जे माझं झालं आहे, ते ही चूक सुधारल्यामुळेच होऊ शकलं आहे. यानंतरही मला बरंच काही शिकायचं आहे. "शुभमन गिलने एक चूक सुधारली आणि त्याला या सामन्यात द्विशतक झळकावता आलं. गिलने नेमकी कोणती चूक सुधारली आणि त्याचं द्विशतक कसं झालं, हे आता समोर आलं आहे. पण गिलने आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे, असं म्हटलं आहे. ही एका चांगल्या खेळाडूची लक्षणं त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yONinj5
No comments:
Post a Comment