Breaking

Friday, July 18, 2025

भारत आणि इंग्लंडचा दुसरा वनडे सामना शनिवारी ५.३० वाजता नाही तर किती वाजता सुरु होणार, पाहा... https://ift.tt/gncY5EH

विनायक राणे : गेल्या सोमवारीच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा कसोटी विजय थोडक्यात हुकला होता. त्या अपयशाची थोड्याफार प्रमाणात भरपाई करण्याची संधी आज, शनिवारी (१९ जुलै) भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळणार आहे. मैदान लॉर्ड्सच असून प्रतिस्पर्धीही यजमान इंग्लंड आहे. महिलांच्या या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात इंग्लंडशी दोन हात करेल. पहिला वनडे सामना हा संध्याकाळी ५.३० वाजता सुरु झाला होता. पण आता दुसरा कसोटी सामन्याची वेळ बदलली आहे. या वनडे मालिकेआधी भारताने टी-२० मालिकेत इंग्लंडला ३-२ असे नमवले आहे. तसेच वनडे क्रिकेटमधील आपला विजयी सिलसिला महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची साऊदम्पटन लढत जिंकून कायम राखला. हे वर्चस्व कायम राखण्यावर भारताचा भर आहे. वनडे क्रिकेटमधील हे यश कायम राखणे हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे; कारण याच मोसमाच्या उत्तरार्धात (३० सप्टेंबरपासून) भारतातच वर्ल्ड कप वनडे स्पर्धेचे आयोजन होत आहे.प्रत्येक खेळाडूकडून संधीचे सोने होत असल्याने वर्ल्ड कप संघात प्रवेशासाठी कडवी स्पर्धा आहे. प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यात आल्यानंतर राखीव फळीतील खेळाडूंनीही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. जायबंदी रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार यांच्या अनुपस्थितीत २१ वर्षीय क्रांती गौडने विश्वास सार्थ ठरविला. पहिला वनडे सामना हा संध्याकाी ५.३० वाजता सुरु झाला होता. पण आता दुसरा वनडे सामना हा दुपारी ३.३० पासून सुरु होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना थोडं लवकर टीव्हीपुढे बसावं लागणार आहे. भारताचा महिला संघ चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी दमदार विजय साकारला होता. त्यामुळे त्यांच्याकडून आता भारतीय चाहत्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय संघ या दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. या सामन्यात भारतीय संघात कोणता बदल होतो की नाही, याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ExmZtMk

No comments:

Post a Comment