मुंबई- गेल्या काही दिवसांपासून तेगुलू अभिनेता जीवन मृत्यूच्या दारात झुंज देत होते. पण आता त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली असून त्यांची प्राणज्योत मावळली आहे. अभिनेता यांचे आज मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्यामुळे निधन झाले. गेले काही दिवस त्यांचे नियमित डायलिसिस सुरू होते आणि त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. काल संध्याकाळी स्थानिक तेलुगू माध्यमांनी त्यांच्या बातमीला दुजोरा दिला. फिश वेंकट यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत. फिश वेंकट यांचे निधन फिश वेंकट यांची प्रकृती बिघडली, तेव्हा त्यांच्या मुलीने आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते. तिने सांगितले की, त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. अभिनेता प्रभासच्या सहाय्यकाने तिच्याशी संपर्क साधला आणि प्रत्यारोपणाचा खर्च भागवण्याचे आश्वासन दिले. "वडिलांची तब्येत अजिबात ठीक नाही. ते खूप गंभीर आहेत आणि आयसीयूमध्ये आहेत. त्यांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्हाला किमान 50 लाख रुपये खर्च येईल. सहाय्यकाने आम्हाला फोन करून आर्थिक मदत देऊ केली. त्यांनी आम्हाला सांगितले की जेव्हा त्याचे प्रत्यारोपण होईल तेव्हा किती खर्च झाला ते सांगा मी तो खर्च देईन," वन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने हे सांगितले होते. काही दिवसांनंतर, प्रभासच्या कुटुंबातील एका सदस्याने मदत मिळालीच नाही असे सांगितले. त्या व्यक्तीने सुमन टीव्हीला सांगितले की, "असे काहीही घडले नाही. कोणी आम्हाला मदत करू शकेल का हे पाहण्यासाठी आम्ही प्रत्येक कॉलला उत्तर देत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने प्रभास अण्णांचा सहाय्यक असल्याचे भासवून आम्हाला फोन केला. त्यानंतर आम्हाला कळले की तो एक बनावट कॉल होता. त्याला असे काही घडत आहे हे देखील माहित नाही. आम्हाला अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही." फिश वेंकट बद्दल 19971 मध्ये जन्मलेले फिश वेंकट हे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी लोकप्रिय होते. त्यांनी बनी, अधर्स आणि धी सारख्या चित्रपटांमधून तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. हा अभिनेता अलीकडेच कॉफी विथ अ किलर या थ्रिलर चित्रपटात दिसला होता. 2020 मध्ये त्यांनी सिद्धू जोन्नलगड्डा यांच्यासोबत माँ विंथा गाढा विनुमा आणि डीजे टिल्लू या चित्रपटांमध्ये काम केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RK1Qq4b
No comments:
Post a Comment