नवी दिल्ली : माणसाला दुर्बुद्धी सुचली की त्याच्या चांगल्या दिवसांचा शेवट जवळ येतो असं म्हणतात. आयुष्यात सुखसोई सगळ्यांनाच मिळतात असं नाही. पण ज्यांना त्या मिळतात त्या सगळ्यांनाच त्याचा लाभ घेता येतो असं नाही. या घटनेतही असंच काहीतरी आहे. एका महिलेचा विवाह अगदी थाटामाटात होतो. मोठ्या आणि सधन कुटुंबात तिचं लग्न होतं. नवरा चांगला कमावता असतो आणि सुख त्यांच्या घरात पाणी भरत असतं. असं असताना एका 'कली' ची कुटुंबात एन्ट्री होते आणि आनंदी संसाराला ग्रहण लागण्याची सुरुवात होते. केवळ विवाहबाह्य संबंधातून आपल्या पतीचा जीव घेताना त्याच्या पत्नीला जराही भय वाटत नाही.
आधी झोपायच्या गोळ्या दिल्या
उत्तम नगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करण देव नावाच्या व्यक्तीचा करंट लागून मृत्यू झाला होता. पण पोलिसांनी केलेल्या तपासात हे हत्याकांड असल्याचं समोर आलं आहे. करणच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्याला झालं आहे. पत्नीने आधी करणला झोपायच्या गोळ्या दिल्या. मग प्रियकराच्या मदतीने त्याला करंट देऊन मारलं, असं पोलिसांनी सांगितलं.पोलिसांनी सगळ्यांना समजावलं
13 जुलै रोजी करण देव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरात त्यांना करंट लागला होता. कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुरुवातीला हा एक अपघात आहे, असं सगळ्यांना वाटलं. त्यामुळे कुणीही पोस्टमार्टम करायला तयार नव्हतं. पण पोलिसांनी सगळ्यांना समजावलं आणि करणच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केलं.करणच्या पत्नीवर संशय येऊ लागला
16 जुलै रोजी करणचा भाऊ कुणाल पोलीस स्टेशनला गेला. त्याला त्याच्या भावाच्या मृत्यूबाबत काहीतरी गडबड असल्याचा संशय होता. दरम्यान, कुणालला त्याच्या वहिनीच्या फोनमध्ये दुसऱ्या पुरुषाशी केलेले संशयित चॅट आढळले. पोलिसांनी कुणालच्या बोलण्याला गांभीर्याने घेतलं आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना करणच्या पत्नीवर संशय येऊ लागला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं.प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला मारण्याचा प्लॅन
पोलिसांनी आरोपी महिलेला विचारलं की तिने हे कृत्य कसं केलं. तेव्हा तिने सांगितलं की, "मी माझ्या प्रियकरासोबत मिळून माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्लॅन बनवला." पोलिसांनी सांगितलं की, "तपासात असं समोर आलं आहे की, पत्नीने आधी नवऱ्याला झोपायच्या गोळ्या दिल्या. तो झोपल्यावर त्याला करंट दिला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला." पोलिसांनी या प्रकरणात पुरावे जमा करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ (खुनाची शिक्षा) आणि ६१ (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iIT4ztq
No comments:
Post a Comment