Breaking

Monday, July 14, 2025

ऋषभ पंतच्या रन आऊटवर अखेर केएल राहुलने मौन सोडलं, मॅचच्या टर्निंग पॉंइंटबद्दल काय म्हणाला, पाहा.. https://ift.tt/z5rgbEm

संजय घारपुरे : भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. पण या सामन्यात एक वेळ अशी आली होती की, भारतीय संघ सहजपणे आघाडी घेईल, असे सर्वांना वाटत होते. कारण आणि यांची चांगलीच जोडी जमली होती. पण राहुलच्या चुकीमुळे पंत रन आऊट झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर भराताचे इंग्लंडवर आघाडी मिळवण्याचे स्वप्न बेचिराख झाले. पण या रन आऊटबाबत आता राहुलने मौन सोडलं आहे.रिषभ पंत चोरटी धाव घेण्यासाठी तायर होता. पण राहुलने त्याला लवकर होकार दिला नाही. पंत फटका मारून पुढे धावत आला होता खरा, पण राहुलने लवकर होकार न दिल्यामुळे तो काही वेळ जागीच थांबला आणि त्यानंतर राहुलच्या होकारानंतर पळाला. पंत जो वेळ थांबला होता, त्याचा फटका त्याला बसला. कारण ही वेळ साधत नेब स्टोक्सने त्याला रन आऊट केलेे आणि भारताला मोठा धक्का बसला होता.'इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी आपल्याला शतक करायचे होते. त्यामुळेच ऋषभ पंत धावचीत झाला. भारतीय संघ पहिल्या डावाच्या आघाडीसाठी प्रयत्न करीत असताना हे घडणे चुकीचे होते,' अशी कबुली लोकेश राहुलने शनिवारी रात्री दिली.तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच्या षटकात राहुलला पुन्हा स्ट्राइक देण्याच्या प्रयत्नात पंत धावचीत झाला. राहुलने उपाहारानंतर शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर किमान दोन शतके करणारा दुसरा भारतीय होण्याचा मान त्याने मिळवला. मात्र, पंत बाद झाल्यामुळे भारताच्या पहिल्या डावातील आघाडीच्या आशा दुरावल्या.'आमची जोडी चांगली जमली होती. शक्य झाले तर उपाहारापूर्वी शतक करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ऋषभला सांगितले होते. बशीर अहमद उपाहारापूर्वीचे षटक टाकत असल्यामुळे शतक पूर्ण करण्याची चांगली संधी आहे, असेच मला वाटले. एका खराब चेंडूवर मी फटकावलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेला. त्यानंतर पंतने एकेरी धाव घेऊन मला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. त्यात तो धावबाद झाला. हे घडायला नको होते. तो धावचीत झाल्यामुळे सामन्याचे चित्र बदलले. तो धावचीत झाल्यामुळे आम्ही दोघेही निराश झालो. जमलेल्या जोडीतील एका फलंदाजाने याप्रकारे विकेट देणे कधीही योग्य नव्हे,' अशी खंत राहुलने व्यक्त केली. भारताला पंतची विकेट चांगलीच महागात पडली. कारण पंत शतकाच्या दिशेने कूच करत होता. पंतने शतक केले असते तर भारताला नक्कीच आघाडी मिळवता आली असती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uojDHre

No comments:

Post a Comment