Breaking

Sunday, July 13, 2025

KL Rahul ने केली इंग्लंडची बोलती बंद, ५ धावांवर कॅच सुटली आणि त्यानंतर केलं तरी काय, पाहा... https://ift.tt/Q89NlYz

लंडन : भारताचा धडाकेबाज फलंदाज ने इंग्लंडचा व्याजासकट बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण राहुलला ५ धावांवर असताना जीवदान मिळालं होतं. पण त्यानंतर राहुलने इंग्लंडचा चांगलाच बदला घेतला. जीवदान मिळाल्यावर राहुलने अशी गोष्ट केली इंग्लंडची बोलतीच त्याने बंद केली.

राहुलला जीवदान कसे मिळाले...

यशस्वी जयस्वाल लवकर बाद झाला आणि भारतावर दडपण आले होते. पण यावेळी सर्वांच्या नजार राहुलवर टिकलेल्या होत्या. कारण राहुलने गेल्या डावात शतक झळकावले होते. या डावात राहुलने चांगली सुरुवात केली. पण यावेळी पाचव्या षटकात राहुलला जीवदान मिळाले. त्यावेळी इंग्लंडचा ख्रिस वोक्स हा जोफ्रा आर्चरबरोबर वेगवान मारा करत होता. या पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंंडूवर राहुल मोठे फटका मारण्यासाठी गेला. पण त्याचे टायमिंग यावेळी चुकले. त्यामुळे हा चेंडू हवेत उडाला आणि ख्रिस वोक्सच्या दिशेने गेला. वोक्सच्या हातावर हा चेंडू आदळला, पण त्याला कॅच पकडता आली नाही. त्यामुळे राहुलला पाच धावावंर असताना जीवदान मिळाले.

राहुलने कसा घेतला इंग्लंडचा बदला..

राहुलची कॅच सोडली आणि त्याच्यावर दडपण वाढले होते. इंग्लंडचे खेळाडू त्यावेळी शेरेबाजीही करत होते. त्यावेळी राहुलने इंग्लंडचा चांगलाच बदला घेतला. कारण त्यानंतर पाचव्या चेंडूच्या चौथ्या चेंडूवर राहुलन अप्रतिम चौकार लागवला. राहुल फक्त तेवढ्यावर थांबला नाही तर त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवरही राहुलने दमदार पदलालित्य दाखवले आणि चौकार वसूल केला. त्यावेळी इंग्लंडचे खेळाडू शांत बसले. राहुलने यावेळी इंग्लंडती बोलती यावेळी बंद केली. राहुलने त्यानंतर जोफ्रा आर्चरच्या षटकातही चौकार लगावला आणि आपण कसे फॉर्मात आहोत, हे त्याने यावेळी सर्वांना दाखवून दिले.राहुलने करुण नायरच्या साथीने चांगली फलंदाजी केली आणि इंग्लंडचे सुरुवातीचे आक्रमण थोपवून लावले होते. राहुलने यावेळी जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांची गोलंदाजी समर्थपणे खेळून काढली आणि त्यामुळेच भारताला विजयाचे स्वप्न पाहता आले. त्यामुळे या डावात राहुल किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/m4juJoN

No comments:

Post a Comment