लंडन: मोहम्मद सिराज भर मैदानात इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू जो रुटला भिडल्याचे पाहायला मिळाले. सिराज यावेळी रूटवर चांगलाच भडकला होता. पण सिराजने यावेळी आपला राग दाखवला नाही, पण त्याने आपल्या मनातली गोष्ट त्याने बोलून दाखवली आणि जो रूटला धारेवर धारले. मोहम्मद सिराज आणि जो रुट यांचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे.इंग्लंडने दोन्ही कसोटी सामन्यांत वेगाने धावा केल्या. इंग्लंड ही बॅझबॉल या रणनितीने मैदानात उतरत असते. यामध्ये इंग्लंड आपण कसोटी क्रिकेट खेळत आहोत, हे विसरते आणि टी २० स्टाईल फलंदाजी करण्यावर भर देते. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी बॅझबॉल वापरुन आपण भारताला कसं पराभूत करू शकतो, हे वारंवार म्हटले होते. पण लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात मात्र भारताने इंग्लंडच्या धावसंख्येवर लगाम लावला होता. त्यानंतर सिराज हा जो रूटला चांगलाच भिडल्याचे पाहायला मिळाले.जो रूट यावेळी साधव फलंदाजी करत होता. त्याने कोणतीही दोखीन उचलली नाही आणि सावधपणे आपली धावसंख्या तो वाढवत होता. त्यावेळी सिराज हा जो रूटजवळ गेला आणि त्याला म्हणाला की, " रूट.. बॅझबॉल कुठे आहे? कुठे आहे तुमचा बॅझबॉल? रूट बघ तरी एकडे, तुमचा बॅझबॉल आहे तरी कुठे? बॅझ बॅझ बॅझबॉल... मला आता बघायचंय की, तुमचा बॅझबॉल नेमका आहे तरी कुठे? " भारतावर या बॅझबॉलमुळे इंग्लंडने दबाव आणला होता. पण या सामन्यात मात्र भारताने इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. त्यांना आक्रमक फलंदाजी करताच आली नाही. त्यामुळे सिरजाने यावेळी रूटलाा डिवचल्याचे पाहायला मिळाले. जो रुटने यावेळी सिराजने कोणतेही उत्तर दिले नाही. पण रुट यावेळी शतकाच्या उंबरठ्यावर आहे. कारण जो रुटने पहिल्या दिवस अखेर नाबाद ९९ धावा केल्या आहेत, त्यामुळे आता तो सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1AMaKzp
No comments:
Post a Comment