Breaking

Sunday, March 28, 2021

शरद पवार, अमित शहा भेटीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल बोलले... https://ift.tt/39k5XSU

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( ) आणि प्रफुल्ल पटेल ( ) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा ( ) यांची भेट घेतल्याची रविवारी जोरदार चर्चा होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार असल्याच्या वृत्ताचा प्रफुल्ल पटेल यांनी इन्कार केला आहे. उद्धव ठाकरे ( ) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मोट शरद पवारांनी बांधली. अशा वृत्तांमध्ये काहीही अर्थ नाहीए, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. प्रफुल्ल पटेल यांच्या या स्पष्टीरणापूर्वी रविवारी दिल्ली पत्रकार परिषदे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. सर्वकाही जाहीर करायचं नसतं, असं अमित शहा म्हणाले होते. यामुळे शहा आणि पवार यांची भेट झाल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं होतं. यापूर्वी महाराष्ट्रातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारची कुठलीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जाणून बुजून हे वृत्त पसरवल्याचा आरोप मलिक यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2P7u3cV

No comments:

Post a Comment