Breaking

Saturday, May 1, 2021

Live update : तामिळनाडू, केरळमध्ये काय होणार? वाचा अपडेट... https://ift.tt/3vzNn1L

आज पाच विधानसभा निवडणुकींचा निकाल आहे. यात तामिळनाडू आणि केरळचाही निकाल लागणार आहे. तामिळनाडूत सत्ताबदल होण्याचा अंदाज एग्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता कायम राहील, असं एग्झिटमध्ये म्हटलं आहे. आता आज निकाल लागणार आहेत. वाचा निकालासंबंधीचे सर्व अपडेट्स... - तामिळनाडू आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरवात - केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांची विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुथुपल्ली चर्चमध्ये प्रार्थना - केरळच्या तिरुवनंतपूरममद्ये मतमोजणीसाठी मतपेट्या बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू - विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल - तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागा आहेत. तिथे सध्या एआयएडीएमके सत्तेत आहे. बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. - एग्झिट पोलच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये यावेळी सत्ताबदल होण्याची दाट शक्यता आहे. डीएमके सत्तेत येण्याची शक्यता आहे. यामुळे डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन हे चर्चेत आहेत. - केरळमध्ये डाव्यापक्षांची सत्ता आहे. पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत. केरळमध्ये सत्ताबदल होणार नाही, असा अंदाज एग्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uc8tTK

No comments:

Post a Comment