Breaking

Tuesday, March 15, 2022

वाळू माफियांना गुर्मी चढली, तहसीलदारांची गाडी फोडली https://ift.tt/LUwOfnA

बुलडाणा : बुलढाण्यातील वाळू माफियांना चांगलीच गुर्मी चढलीय. साहेबांची गाडी फोडण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचलीय. जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कठोरा शिवारात सोमवारी सायंकाळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी महसूल पथकावर हल्ला चढवून तहसीलदारांची वाहन फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेप्रकरणी ४ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पूर्णा नदी काठावरुन अवैध वाळू वाहतूक जोमात सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी महसूल विभागाचे अवैध वाळू वाहतूक नियंत्रण पथक पूर्णा नदी काठावरील कठोरा येथे जात असताना एका इनोव्हा गाडीने ओव्हरटेक करुन तहसीलदारांची गाडी अडवून मंडल अधिकारी आणि तलाठ्याला मारहाण करून गळ्यात असलेलं शासकीय ओळखपत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर घटनेतील आरोपी सध्या फरार आहे. मात्र घटनेबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्याचा कारणही तसंच आहे. शासकिय गाडीचे वाहनचालक सातभाकरे हे पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आपल्या अंगातील शर्ट आणि गळ्यातील शासकीय ओळखपत्र तोडत असल्याचे दिसून येत आहे. तसा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असल्याने या घटनेबद्दल चर्चेला पेव फुटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nYcLo37

No comments:

Post a Comment