नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निपथ (Agneepath) भरती योजनेची घोषणा करत या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. या योजनेसाठी २१ वर्षे ठेवण्यात आली होती. एकीकडे या योजनेलाच विरोध होत असताना, सरकारने या योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार ही वयोमर्यादा २१ वर्षांवरून वाढवून ती २३ इतकी केली आहे. (government extended upper age limit for agnipath scheme by 23 years from 21 years) केवळ या पहिल्या भरतीसाठीच ही वयोमर्यादा शिथिल करण्याची सवलत असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. गेली दोन वर्षे सैन्यभरती झालेली नाही. केवळ याच कारणामुळे वयाची ही सवलत दिली जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या भरती पासून वयाची मर्यादा ही २१ वर्षे इतकीच राहणार आहे. क्लिक करा आणि वाचा- करोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लष्करातील भरतीची प्रक्रिया रखडल्यामुळे केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना जाहीर केली आहे. हवाई दल, भूदल आणि नौदल, अशा तिन्ही दलांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अग्निपथ या योजनेमुळे देशातील तरुणांचे आरोग्य आणि फिटनेस सुधारेल असे संरक्षण मंत्री यांनी म्हटले होते. क्लिक करा आणि वाचा- अग्निपथ योजनेला देशभरातून होतोय विरोध देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केल्यानंतर या योजनेला देशभरातून विरोध होऊ लागला. राजनाथ सिंह यांच्या घोषणेनंतर बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा अशा राज्यांमधून या योजनेला विरोध दर्शविण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- देशात अनेक ठिकाणी या योजनेविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. तसेच छपरा येथे विद्यार्थ्यांनी रेल्वेला आग लावल्याची गंभीर घटना देखील घडली आहे. सरकारने ही योजना मागे घ्यावी, अशी आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sKjiG83
No comments:
Post a Comment