सोका (जपान) : फॉर्म्युला वन शर्यतींमधील मोटारींचा सर्वोच्च वेग ताशी ३७२.६ किलोमीटर असतो. यापेक्षा वेगवान काय असू शकेल बरे? याचे उत्तर बॅडमिंटन दुहेरीतील भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू सात्त्विकसाईराजकडे आहे. या मोटारींच्या सर्वोच्च वेगापेक्षाही वेगवान सर्व्हिस सात्त्विकने केली आहे. ज्याची नोंद ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. सात्त्विकच्या सर्व्हिसचा वेग ताशी ५६५ किलोमीटर आहे. चिराग शेट्टीसह बॅडमिंटन दुहेरीत भाग घेणाऱ्या सात्त्विकने अलीकडेच इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धा जिंकली. गेल्या दहा वर्षांपासून वेगवान सर्व्हिसचा विक्रम मलेशियाच्या टॅन बून हीआँगच्या नावावर होता. २०१३मध्ये त्याने ४९३च्या वेगात सर्व्हिस केली होती. तो विक्रम सात्त्विकने मोडीत काढला. महिलांमध्ये हा विक्रम मलेशियाच्या टॅन पर्लीच्या नावावर जमा झाला आहे. तिने ४३८च्या वेगाने सर्व्हिस केली. ‘भारताचा सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि मलेशियाच्या टॅन पर्ली यांच्या नावांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, हे जाहीर करताना योनेक्सला खूप आनंद होतो आहे. पुरुषांमध्ये सात्त्विकने तर महिलांमध्ये टॅन हिने विक्रमी वेगात सर्व्हिस केली आहे. याआधीच्या विक्रमाची नोंद २०१३च्या मे महिन्यात झाली होती. तो विक्रम सात्त्विकने मोडीत काढला आहे’, असे क्रीडा साहित्य तयार करणारी जपानी कंपनी योनेक्सने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.इतर क्रीडा प्रकारांतील विक्रमी वेगबॅडमिंटन ः ५६५ फॉर्म्युला वन शर्यत : ३७२.६ गॉल्फ : ३४९.३८ टेनिस : २६३ आइस हॉकी : १७७बेसबॉल : १६९.१४ फुटबॉल : १२९ टेबल टेनिस : ११६. योनेक्स कंपनी टोकियो फॅक्टरी जिममध्ये ही गोष्ट आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन हे १४ एप्रिल २०२३ या दिवशी करण्यात आले होते. पण आज याबाबतचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही क्रीडा प्रकारात यापेक्षा जलद कोणतीही गोष्ट नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सात्विकच्या नावावर आता विश्वविक्रम नोंदवला गेला आहे आणि गिनीज बुकनेही त्याची नोंद घेतली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0JCikKb
No comments:
Post a Comment