Breaking

Tuesday, July 18, 2023

Nanded Crime: कट रचला, दारु पाजली मग मित्राचेच मित्रावर ३० वार, कारण वाचून हादरुन जाल... https://ift.tt/icmyTDu

नांदेड: मेव्हणीच्या मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला आहे. १७ जुलैला रात्री अकरा वाजेच्या सुमारास चौफाळा परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. शरीरावर २५ ते ३० वेळा वार करण्यात आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. किरण माने असं या मयताचे नाव आहे.मयत किरण माने हा इतवारा भागातील भावेश्वर येथील रहिवासी असून तो विवाहित आहे. त्याचे आरोपी मित्र शिवा माने याच्या मेव्हणीच्या मुलीसोबत मागील अनेक वर्षांपासून अनैतिक प्रेम संबंध सुरु होते. ही बाब माहिती झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद देखील झाला. या प्रेम संबंध यावरून किरण माने आणि शिवा माने यांच्यात अनेक वेळा वाद झाला होता. वारंवार सांगूनही किरण माने काही ऐकत नव्हता. शेवटी मेव्हणीच्या मुलीच्या प्रियकराचाच काटा काढण्याचा कट शिवा माने आणि त्याच्या मित्रांनी रचला. १७ जुलै रात्री अकराच्या सुमारास शिवा माने, सुभाष माने आणि इतर काही जण चौफाळा भागातील पाण्याच्या टाकी जवळ पार्टी केली. आरोपीनी किरण याला दारू पाजली. त्यानंतर आरोपीनी किरण माने याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. एक दोन नव्हे तर तब्बल २५ ते ३० वेळा पोटात, गळ्यावर, छातीत चाकू भोसकले. रक्तबंबाळ झालेल्या किरणचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सर्वजण फरार झाले.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान, या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी इतवारा पोलिसांनी मयताची पत्नी प्रतिभा किरण माने हिच्या तक्रारीवरून आरोपी शिवा प्रभाकर माने आणि अविनाश नंदाणे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. दरम्यान, आरोपी आणि मयत हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rxq9bpk

No comments:

Post a Comment