Breaking

Friday, July 28, 2023

भाजपचा धुळेकरांच्या पाण्याशी खेळ! ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप; म्हणाले- हे स्वप्नच राहणार https://ift.tt/L38RjPg

धुळे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिका प्रशासन १५४ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे ललीत माळी यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, खाऊगिरी प्रवृत्तीमुळे ३३० कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेल्या जमा आहे. शहरातील नगांववारी येथील सुमारे २ कोटी खर्च करुन साडे वर्षापुर्वी बांधण्यात आलेले जलकुंभ एकही वेळा न वापरता तडे जाऊन हा जलकुंभ निकामी झाला आहे. या योजनेतील इतर ११ जलकुंभाचीही स्थिती फारशी वेगळी नाही. पाणीपुरवठा योजनेतील १५४ कोटी आणि अक्कलपाडा पाणीपुरवठा १७५ कोटी असे एकुण धुळेकरांचे ३२९ कोटी पाण्यात धुळेकरांना दररोज पाणी मिळण्याचे 'स्वप्न' हे स्वप्नच राहिल्याचा घणाघातही ललित माळी यांनी केला आहे. चार वर्षापासुन वापर न झाल्याने संपुर्ण जलकुंभास चारही बाजुने मोठया प्रमाणावर तडे गेले आहेत. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना अंतर्गत धुळे शहरात आणलेल्या पाण्याने सदर जलकुंभ मागील काही दिवसांपासुन भरण्याचे काम सुरु होते. सदर जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्या जलकुंभाना सर्वत्र तडे जात असल्या कारणाने त्यातुन पाणी झिरपण्यास सुरुवात झाली. सदरची बाब मनपा प्रशासनास कळल्यानंतर तातडीने सदर जलकुंभातील संपुर्ण पाणी लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वर सोडण्यात आले. या जलकुंभात जास्त कालावधीसाठी पाणी ठेवले असता जलकुंभ फुटण्याची दाट संभावना आहे. जलकुंभालगतच नगावबारी परिसरातील दाट वस्ती आहे. सदर वस्तीत कच्ची आणि पक्की घरे आहेत. अशा परिस्थितीत जलकुंभ फुटल्यास वित्तहानी होईल. तसेच जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. १५४ कोटी रुपयातून बांधलेल्या जलकुंभांच्या कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे सदर कामांची चौकशीची मागणी शिवसेनेने वेळोवेळी केली. परंतू मनपाने भ्रष्टाचार लपविण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप ललित माळी यांनी केला. त्यामुळे सदर जलकुंभाचा स्ट्रक्चर ऑडिट करावे अन्यथा गरज नसल्यास सदर जलकुंभाला जमीनदोस्त करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9txI0OF

No comments:

Post a Comment