Breaking

Wednesday, July 26, 2023

लाचेच्या नोटा पाहिल्याशिवाय झोपच येत नाही, घरात लाखाेंचे दागिने, इंजिनीअरचा खजिना पाहून चक्रावाल https://ift.tt/mZXIbn2

भागलपूर: पैशांनी भरलेली सुटकेस, दागिन्यांनी भरलेली पेटी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेलं कपाट. हे कुठल्या राजा महाराजाचं घरी नाही तर एका सामान्य इंजिनीअरच्या घरात सापडलं आहे. हे पाहून काही काळ अधिकाऱ्यांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. भागलपूरच्या बिहार स्टेट ब्रिज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता श्रीकांत शर्मा यांच्या घरातील हे दृश्य आहे. जिथे सध्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि अनेक बेनामी मालमत्तेची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.छाप्यात मोठा खुलासाया छाप्याबाबत दक्षता विभागाचे पोलिस उपअधीक्षक सत्यकांत यांनी सांगितलं की, कार्यकारी अभियंत्याच्या नावावर अनेक बेनामी मालमत्ता असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार २४ जुलै रोजी वॉरंट जारी करण्यात आले आणि भागलपूरच्या जोगसर पोलिस स्टेशन हद्दीतील हनुमान नगर येथील त्यांच्या निवासस्थानासह राजधानी पाटणा येथील कार्यालयावर छापे टाकण्यात आले. जेथे दक्षता पथकाने ५०० रुपयांच्या नोटांनी भरलेल्या दोन ट्रॉली बॅग तसेच लाखोंचे दागिने आणि अनेक बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत. नोटा बघितल्याशिवाय झोप येत नाहीलाचखोर अभियंता जणु धनकुबेर आहे. त्याच्या संपत्तीचा अंदाज बांधणे कठीण आहे. तो प्रकल्प अभियंता असल्याचं सांगितले जात आहे. त्यांच्या देखरेखीखाली अनेक प्रकल्प झाले आहेत. भोलानाथ उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी २० सदस्यांच्या टीममध्ये त्यांचा समावेश होता. विजिलेन्स विभाग त्याची संपूर्ण माहिती घेत आहे. तपशील समोर आल्यानंतर बेकायदेशीर मालमत्तेचे अचूक मूल्यांकन करणे शक्य होईल, असंही सांगितलं जात आहे. सध्या त्याच्या घरातून ८० लाखांची रोकड आणि कोट्यवधींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अभियंत्याला विजिलेन्स विभागाने ताब्यात घेतलं आहे.पोलिस उपअधीक्षक संजय जयस्वाल, पोलिस निरीक्षक संजीव कुमार, पोलिस निरीक्षक सत्येंद्र राम, पोलिस उपनिरीक्षक आणि अनेक हवालदार या पथकात आहेत. हा छापा बराच वेळ चालला आणि नोटा मोजण्याचे यंत्र आणण्यात आले. लवकरच सर्व तपशील प्रसारमाध्यमांसोबत शेअर केला जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लाचेच्या नोटा पाहिल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती, अशी चर्चा सध्या परिसरात आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, त्याने लाचेच्या पैशातून अनेक मालमत्ता बांधल्या आहेत. त्याबाबत तपासानंतर खुलासा होईलच.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LpMhRbr

No comments:

Post a Comment