Breaking

Wednesday, July 26, 2023

मद्यधुंद ट्रक चालकाची ५ वाहनांना धडक, दुचाकीला दोन किलोमीटरपर्यंत नेले फरफटत, सांगलीत थरार https://ift.tt/N0pHSdA

सांगली: सांगलीतील मिरजेहून कुपवाडच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन आलेल्या मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने पाच हून अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकखाली आलेल्या दुचाकी वाहनांना या चालकाने सुमारे दोन किलोमीटर फरफटत नेले. याप्रकरणी ट्रक चालक रामदास पांढरे याच्यावर कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी या ट्रकवर तुफान दगडफेक केली. यात चालक गंभीर जखमी झाला.बेळगावहून ट्रान्सपोर्टचा माल खाली करून वाहन तळास येत असताना मिरजमार्गे सुसाट वेगात चालक पांढरे हा ट्रक चालवत आला. कुपवाड मधील गोदरेज कारखान्याच्या पुढे एका चारचकी वाहनास धडक दिली. त्यानंतर या ट्रकने बडीपिर जवळ छोटा हत्तीला धडक दिली. पुढे थोरला गणपती चौक येथे दुचाकीला, ठोकरात संत रोहिदास चौकात तीन दुचाकींना धडक दिली. एक मोपेडस्वरालाही धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून मोपेडस्वार बाजूला पडला तर ट्रकच्या पुढील डव्या बाजूच्या चाकात अडकल्याने मोपेड फरफटत एमआयडीसीच्या दिशेने दीड-दोन किलोमिटर अंतरावर ट्रक थांबला. यावेळी मोपेडचा चक्काचूर झाला होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करत त्यावर दगडफेक केली. यावेळी ट्रकचालक पलायन करत असताना पडून तो जखमी झाला. यानंतर नागरिकांनी ट्रक चालकास पोलिसांच्या स्वाधीन केले. हा थरार जवळ जवळ एक तासाहून अधिक वेळ सुरू होता. तासभर एम आय डी सी मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. घडलेलेल्या थरारक घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SxJYmbf

No comments:

Post a Comment