दापोली : कोकणात पावसाची संततधार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रायगड जिल्ह्यात महाड, चिपळूण व खेड प्रशासन अलर्ट मोडवर असतानाच आता गुहागर व दापोली तालुक्यातही दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दापोली तालुक्यात दाभोळ भंडारवाडा येथील हनुमान मंदिराची भिंत कोसळून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे दापोलीतील लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरले आहे. प्रशासनाने तातडीने धरणाची पाहणी करत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, धरणाला लागली कळ ती यावरी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.दापोली तालुक्यात सोवेली धरणाला गळती लागल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सोवेली धरणाची पाहणी केली. या पाहणीत धरणाच्या भिंतीच्या मध्यभागी आणि पायाजवळ पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामस्थांनी ५ वर्षांपासून गळती होत असून त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, मात्र पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब दापोली प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. या पाहणीनंतर उपविभागीय अधिकारी डॉक्टर थोरबोले यांनी संबंधित विभागाला तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत व लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे धरण ज्यांच्या अधिपत्याखाली येते त्या लघुपाटबंधारे विभागाला प्रांताधिकार्यांनी लेखी पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी कळवल आहे. या घराची आज रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांचा उपस्थितीत पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील वर्ग एक दरडप्रवण गावातील १६ कुटुंबांना तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फत स्थलांतरित करण्यात आले. गुहागर तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीच्या पाठीमागील भागी दोन वर्षांपूर्वी भेग गेली असून यावर्षी आज अखेर कोणतेही वाढीव भूस्खलन झालेले नाही. पाचेरी आगर येथील काजरोळकर वाडी येथील दोन घरे सध्यस्थितीत बंद आहेत. या घरांखाली सरंक्षण भित बांधण्यात आली आहे. दरम्यान पाचेरी आगर बौद्धवाडी येथील रस्त्याचे खालील बाजूस विजय यशवंत यादव यांचे घर आहे. परंतु सद्यस्थितीत ते घर बंद आहे. मात्र या रस्त्यावर मातीचा काही भाग खाली आला आहे. घटनास्थळी गुहागर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन संबंधित क्षेत्राची पाहणी केली आहे. मात्र पावसामुळे कुठेही जीवितहानी अथवा अनुचित प्रकार घडला याची माहिती नाही. दरम्यान, रात्री उशिरा दापोली खेड मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. दापोली खेड मार्गावर दुपारनंतर आलेले पाणी रात्री उशिरा ओसरल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता, तर रात्री उशिरा काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरीही प्रशासन मात्र लक्ष ठेवून आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ASwE9ru
No comments:
Post a Comment